माझे...

जीवन भर आपण है माझे ते माझे करीत सर्व वस्तु गोला करीत बसतो परंतु जलताना ते सर्व तर एथेच सोडतो मग त्या कमावतो तरी का..?? त्याचा मोह तरी का..?? जर कफ़न पण आपले स्वताचे नसते...!!

या भौतिक जगतात सर्व वस्तु मिलवित आणि त्या वस्तु साठीची विवादात्मक जीवन पद्धति अखेर काय देते..?? काहीच नाही...!!

केवळ मानसिक व भावनिक संघर्ष...!!

   अखेर मात्र माझे ऐसे कोणीच नसते आणि सोबत ही काहीच नसते..!

आयुष्याच्या खड़तर प्रवासात खूप गोष्टी सदैव घडत असतात. काही शिकवून जातात तर काही विचारशील बनवितात. आत्मचिंतन आणि दर्शन यांची भेट घालूनदेतात. सूर्योदयापासून सुर्यास्तापर्यंत या जीवन प्रवाहित ऐसे अनेक जण भेटतात..,

 जे जग आणि जीवन यांची परिभाषा उलगडवून सांगतात फक्त अनुभूतिच्या जीवावर...!!

सगळेच जीवन भराचे सगे सोबती नाही बनत, काही अल्प तर काही दीर्घ हिशोब घेवून येतात, काही विनाकरण त्रास दायक ठरतात तर काही विनाकरण प्रेम दायक ही सिद्ध होतात, काही दिव्यतेच्या गाभार्यात स्थान प्राप्त करतात तर काही नैतिकतेच्या रासातळाला ही जावून बस्तात.. खूप जण आपल्या अगदी सहज जवळ येतात आणि अगदी सहज दुरावतातही..!! कितीतरी व्यक्ति विश्वास आणि भावना यांच्या परमोच्च स्थानावर पोहोचतात तर अनेक शब्दानची फक्त खिरापत वाटतात आणि बेईमान होऊन जगतात..

अनेक जन आपल्याला अनोलख्या गत शब्द देतात आणि विक्रेटयसमान विसरतातही.....

    या मागील तथ्य काय..?? तर जीवन अल्प आहे कायम कोणीच नाही, शास्वत फक्त वर्तन आहे जे चिरन स्वरुपात सोबत येते मग गर्व काशयाचा??

सूर्यास्तानंतर तर स्वताःची सावलीही दूर जाते अखेर शेवटी आपण एकटेच तर असतो
अगदी मृत्यु समयी देखील आपण एकटेच येतो, जन्म आणि मृत्यु या शास्वत गोष्टी ही एकटया च येतात !! सोबत असतात फक्त आणि फक्त आपण केलेल्या हर जन्मातिल कर्म संस्कार...!!

   मग मोह तो काशयाचा आणि बन्धन ते का..??

मुक्त आणि प्रेमयुक्त जीवन जगु या...!!

- वृषाली सानप काले

Comments

Popular posts from this blog

प्राचीन भारतीय आर्य भाषा की विशेषताएं

संस्कृत भाषा के शब्द भंडार से सम्बंधित बातें

इम्तिहान